डोंगरगाव ता.देवळा जि.नाशिक
gpdongargaon2016@gmail.com
डोंगरगाव ता.देवळा जि.नाशिक
gpdongargaon2016@gmail.com
सुचना :
देवळा तालुक्यात डोंगरगाव हे खेडे गाव आहे. डोंगरगाव या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावाची लोकसंख्या २८८७ इतकी आहे. व त्यात एक महसुली गाव आहेत. गावापासून ते मुख्यालय (देवळा) २० कि.मी.आहे या गावातील लोकांचा मुख्यता: शेतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. तसेच डोंगरगाव गावातील सुधारणा चांगली आहे. या गावात जि. प शाळा इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आहे. तसेच या गावात डोंगरगाव ,झगडेपाडा, कमळाबाईनगर व वृंदावन नगर या ठिकाणी चार अंगणवाडी केंद्र आहेत. येथे भव्य मंदिर असून येथील लोक पावसाळ्यात मुख्यता: मका, कांदा , बाजरी, भुईमूग ईत्यादी पिके घेतात. सदरचे गाव हे मेशी ते नांदगाव रस्त्यावर वसलेले आहे.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वागीण विकास घडवून आणतात.ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
ग्रामपंचायत डोंगरगाव हे अशा रित्या नाशिक जिल्ह्यात आपल्या गावाची एक नवीन ओळख निर्माण करत आहे.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ (हेक्टर मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात डोंगरगाव हे गाव आहे.हे गाव उत्तर महाराष्ट्र प्रदेशातील आहे. हे गाव जिल्हा मुख्यालय नाशिकपासून ६८ किमी अंतरावर आहे.देवळा पासून १० किमी. राज्याची राजधानी मुंबईपासून २५४ किमी.आहे.डोंगरगाव गावाला पोस्ट मुख्य कार्यालय देवळा येथे आहे.
कळवण २८(km) सटाणा २७(km) चांदवड २० (km) मालेगाव ५१ (km) हि शहरे आहेत.
डोंगरगाव हे गाव साधे,कष्टप्रधान आणि पारंपरिक जीवन शैलीसाठी ओळखले जाते.शेती हा गावकरींचा मुख्य व्यवसाय असून कांदा.मका,बाजरी आणि विविध हंगामी भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
गावात सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा दृढपणे जपल्या जातात.वर्षभर साजरे होणारे सन उत्सव ग्राम दैवतांची पूजाअर्चा तसेच डोंगऱ्या देवाची पूजा हा सन गावाच्या एकात्मतेचे प्रतिक मानले जाते.येथे आदिवासी परंपरा आणि संस्कृती चे जतन केले जाते.होळी,गणेशोत्सव,दिवाळी,नवरात्र सारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.
येथील लोक ‘अतिथी देवो भाव, ह्या मूल्यांना आचरणात आणणारे आहेत. येथील लोक मेहनती लोक आहेत. तरून पिढी शिक्षण, खेळ व रोजगाराच्या संधी शोधून प्रगती कडे वाटचाल करत आहे. लोकजीवनात आदिवासी संस्कृती व पारंपारिक ग्रामीण जीवनमान आढळून यते. गावाची विकासाकडे वाटचालीचे कार्य उत्तम असे सुरु आहे.
ग्रामदैवताचे मंदिर:-श्रीराम मंदिर , महादेव मंदिर ,मारुती मंदिर अहिल्यादेवी मंदिर ,खंडेराव महाराज मंदिर हे डोंगरगावातील काही प्रसिद्ध देवस्थान आहेत.
हिरवीगार शेती:- गावातील हिरवीगार शेती पाहण्याजोगी आहे.
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री.प्रशांत पवार
श्री.देवीप्रसाद मांडवडे
सौ.पौर्णिमा देवाजी सावंत
सौ.लताबाई सुकदेव हिरे
कु.संकेत राजेंद्र पवार
सौ.संजय श्रावण सावंत
श्री.दत्तात्रेय निंबा सावंत
सौ.रत्ना नागेश सावंत
सौ.अश्विनी अनिल सावंत
श्री.कृष्णाजी जयवंत सावंत
श्री.मोठाभाऊ सजन पानसरे
सौ.उज्वला राजेंद्र अहिरे
सौ.संगिता रमेश निकम
श्री प्रकाश श्रीराम वैराळ – ग्राम महसूल अधिकारी
श्री.प्रल्हाद हरी केदारे – पोलीस पाटील
श्री.विजय धुडकू जाधव – कृषी सहाय्यक अधिकारी
श्री.रामदास देवराम पोरजे – आरोग्य सेवक
.संकेत राजेंद्र पवार – बी.एल.ओ.
श्री.भूपेंद्र सुदाम राठोड – वन रक्षक